भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ

til jalile tandul | kam krodhe taise chi khal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ ॥१॥ कां रे सिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥ मानदंभपोटासाठीं । केली अक्षरांची आटी ॥२॥ तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥३॥ वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥४॥ तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघा चि अधर्म ॥५॥