भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारक प्रसिद्ध तीर्थ तें अगाध

tarak prasiddha tirtha ten agadh

तारक प्रसिद्ध तीर्थ तें अगाध । नामाचा उद्बोध नंदाघरी ॥ १ ॥ प्रकाश पूर्णता आदिमध्यें सत्ता । नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥ २ ॥ निवृत्ति साधन कृष्णरूपें सुख । विश्वीं विश्वरूप हरि माझा ॥ ३ ॥