भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव दिव्य रत्नमणि मस्तकीं किरीटी । मळवट लल्लाटीं कस्तुरीचा

tanv divya ratnamani mastakin kiriti | malavat lallatin kasturicha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव दिव्य रत्नमणि मस्तकीं किरीटी । मळवट लल्लाटीं कस्तुरीचा ॥१॥ माथां मोरपिसावेठीं कुंडलें गोमटीं । पाहात कृपादृष्टी निजभक्ताम ॥२॥ तो पुंडलिकाचा ठेवा पूर्वपुण्यराशी । वैकुंठनिवासी देवरावो ॥३॥ वदन निर्मळ भाव सुस्मित वेल्हाळ । दर्शनी रत्नकीळ तेज फांके ॥४॥ त्या सुखाचे अधिकारी भक्त सप्रेमळ । ह्रदयीं सर्वकाळ हरिचे ध्यान ॥५॥ कौस्तुभ वजयंती पदक ह्रदयावरी । शोभत साजिरी तुळसीमाळा ॥६॥ श्रीवत्सलांछन प्रीतीचें भूषण । चर्चिला चंदन श्यामतनु ॥७॥ शंखचक्र करीं ते कर कटावरी । पितांबरधारी जलदनीयल ॥८॥ तेणें दिव्य तेजें ब्रह्मांड धवळलें । प्रकाशें लोपलें दिग्मंडळ ॥१०॥ सकळ संत द्विज देखती चतुर्भुज । शंख चक्रांबुज गदापाणि ॥११॥ कीटकपक्षी पशुपाषाण तरुवर । देखती द्विजवर विठठलरुप ॥१२॥ परमानंद बोधें निवाले आनंदें । भेदाभेद द्वंद्वे विसरोनि गेलीं ॥१३॥ एकाविण दुजें तेथें न दिसे पैं आन । नाहीं आठवण देहभावा ॥१४॥ सबाह्य कोंदली अवघी विठठलमूर्ति । सुखाची विश्रांति योगियांच्या ॥१५॥ प्रेमें वोसंडत सकळ भक्तजन । देती आलिंगन एकमेकाम ॥१६॥ हर्षे निर्भर चित्तीं आनंदें गर्जती । पावले विश्रांति सकळ द्विज ॥१७॥ ऐसा ब्रह्मानंद सोहळा भोगवी सकळां । आपुल्या प्रेमळा निजदासा ॥१८॥ करोनि सावध वैकुंठींचा राणा । नामा घाली चरणावरी त्यांच्या ॥१९॥