भजनी मालिका
← भजनांकडे परत

ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरी कळे

taken krupan to jevun kay ghali | ahach te chalivari kale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरी कळे ॥१॥ काय तुम्हां वेचे घातलें सांकडें । माझे आलें कोडें आजिवरी ॥ध्रु.॥ सेवेंविण आम्ही न लिंपों त्या कार्या । झाला देवराया निर्धार हा ॥२॥ तुका म्हणे तुझीं राखावया ब्रीदें । येणें अनुवादें गर्जतसे ॥३॥