भजनी मालिका
← भजनांकडे परत

डौरलों भक्तीसुखें । सेवूं अमृत हें मुखें

dauralon bhaktisukhen | sevun amrut hen mukhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
डौरलों भक्तीसुखें । सेवूं अमृत हें मुखें ॥१॥ संतसंगें सारूं काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥ध्रु.॥ ब्रह्मादिकांसी सुराणी । तो हा आनंद मेदिनी ॥२॥ नाहीं वैकुंठींचा पांग । धांवे कथे पांडुरंग ॥३॥ मुक्त व्हावें काशासाठीं । कैची येणें रसें तुटी॥४॥ तुका म्हणे गोड । हें चि पुरे माझें कोड ॥५॥