भजनी मालिका
← भजनांकडे परत

तट्टाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लहान नेणे

tattache jatila nahin bhid bhar | lata mari thor lahan nene

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तट्टाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लहान नेणे ॥१॥ परी तो त्या विशेष मनुष्य होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥ बेरसा गाढव माय ना बहीण । भुंके चवीविण भलतें चि ॥२॥ तुकयाबंधु म्हणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥३॥