भजनी मालिका
← भजनांकडे परत

तनु चोरिली कोठें मी पाहों

tanu chorili kothen mi pahon

तनु चोरिली कोठें मी पाहों । भूक लागली काय मी खावों ॥१॥ पाहणें नाहीं काय पाहों । ध्यान नाहीं काय ध्यावों ॥२॥ भिंत नाहीं काय चित्र लिहों । चित्र सरलिया तया नाहीं ठावो जी देवा ॥३॥ निवृत्तिदास म्हणे कैसें हो काई । रखुमादेविवरा विठ्ठला ध्यायीं ॥४॥