भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळियाचाही डोळा बुध्दी । माझी उघडूनियां कृपानिधी । देखणी करुनियां त्रिशुध्द । निजात्मपदीं स्थापिली

doliyachahi dola budhdi | majhi ughaduniyan krupanidhi | dekhani karuniyan trishudhda | nijatmapadin sthapili

रचनाकार: संत निळोबा · अभंग
डोळियाचाही डोळा बुध्दी । माझी उघडूनियां कृपानिधी । देखणी करुनियां त्रिशुध्द । निजात्मपदीं स्थापिली ॥१॥ तेणें दिसती ठायां ठावो । हदय सकळांचेही भाव । संत दावी जे अनुभव । आणखीही सर्व मायाकृत ॥२॥ नवल कृपेची हें जाती । फिटली मोह ममता भ्रांती । उत्पत्ति स्थिती प्रळय होती । तें तें निगुती आटलें ॥३॥ देखणें झालें नयनानयन । देखती आपुलेंही वर्तन । राहिलें ठायींच ते जडोन । अभेद होऊन देखती ॥४॥ निळा स्वामी सद्गुरुनाथा । देखणा तूंचि मी नाहीं आतां । तोडूनी मी हे माझी ममता । आपण आतौता मेळविलों ॥५॥