भजनी मालिका
← भजनांकडे परत

डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं

dai ghaluniyan poren | tyanchin guren chukavilin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥ खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥ मारिती माया घेती जीव । नाहीं कीव अन्याया ॥२॥ तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥३॥