भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळियाची भुक हारपली । पाहतां श्रीविठ्ठल माउली

doliyachi bhuk harapali | pahatan shriviththal mauli

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
डोळियाची भुक हारपली । पाहतां श्रीविठ्ठल माउली ॥१॥ पुंडलिकें बरवें केलें । परब्रह्मा उभें ठेलें ॥२॥ अठ्ठावीस युगें जालीं । आद्यापि न बैसें खालीं ॥३॥ उभा राहिला तिष्ठत । आलियासीं क्षेम देत ॥४॥ ऐसा कृपाळु दीनाचा । एका जनार्दनीं साचा ॥५॥