भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळियांनें रूप पहावें साचार । मुखानें उच्चार रामनाम

doliyannen rup pahaven sachar | mukhanen uchchar ramanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
डोळियांनें रूप पहावें साचार । मुखानें उच्चार रामनाम ॥१॥ हृदयीं आठव नाम तें वसावें । करें पैं अर्पावे संतचरण ॥२॥ पदें प्रदक्षणा करी तीर्थाटन । हेंची पैं कारण पूजनाचें ॥३॥ एका जनार्दनीं ऐशी करी पूजा । तेणें गुरुराजा तोष पावे ॥४॥