भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोलत डोलत टकमक चाले । गोजिरीं पाउलें टाकू-नियां

dolat dolat takamak chale | gojirin paulen taku-niyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
डोलत डोलत टकमक चाले । गोजिरीं पाउलें टाकू-नियां ॥१॥ पायीं रुणझुण वाजताती वाळे । गोपी पाहतां डोळे मन निवे ॥२॥ सांवलें सगुण मानस मोहन । गोपी रंजवण नामा ह्मणे ॥३॥