भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळियांत डोळा काळियांत काळा

doliyant dola kaliyant kala

डोळियांत डोळा काळियांत काळा । देखण्या निराळा निळारुप ॥१॥ ब्रह्म तत्त्व जाणे ज्योतिरुपें सगळा । ज्योतीही वेगळा ज्योती वसे ॥२॥ ज्ञानदेव म्हणे देवा ऐसी ज्योती । अर्थमात्रा उत्पत्ति सर्वाजीवां ॥३॥