भजनी मालिका

भजने

जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां ॥१॥ आतां एक करीं धावणिया धांवा । बुडतों केशवा काढीं मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जन्मा आलीयाचा लाभ । पद्मनाभ दरुषणें ॥१॥ म्हणउनि लवलाहे । पाय आहे चिंतीत ॥ध्रु.॥ पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळु माउली ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥१॥ नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाईच्या ॥१॥ पाप ताप दैन्य जाईल सकळ । पावसी अढळउत्तम तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा ॥१॥ संसारदुःखें नासिलीं तेणें । उत्तम हें केणें नामघोष ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण ॥१॥ संतसंगें सुख हुंडारलें जाणा । नामसंकीर्तना ओळखत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जन्मा येणें घडे पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया ॥१॥ मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्मांचा पोसणा तुझा मी पामर । काय आतां विचार केशिराजा ॥१॥ घरासी पैं जातां ताडतील मज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्मांची वेरझारी । तुम्हांविण कोण वारी । जाचलों संसारी । सोडवण करी देवराया ॥१॥ शरण शरण पंढरीराया । तुम्हां आलों यादवराया । निवारोनियां भया । मज तारा या सागरीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥ कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥ कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा