भजनी मालिका

भजने

जनी म्हणे पांडुरंगा माझ्या जीवींच्या जीवलगा। विनवितें सांगा। महिमा साधुसंतांचा ॥१॥ कैसी वसविली पंढरी। काय महिमा भीमातीरीं । पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

जनीचिया बोलें करी नित्य काम। वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥ जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं तयाचे चरणीं ओढवी माथा।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

जनींचें बोलणें वाची नित्य कोणी । तयाचे आंगणीं तिष्ठतसे ॥१॥ जनीचिया पदां आखंडित गाये । तयाचे मी पाये वंदी माथां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जनीचेंबोलणेंवाचीनित्यकोणीतयाचेआंगणींतिष्ठतसे||१|| जनीचियापदांअखंडितगाये। तयाचेमीपायेबंदींमाथां||२||

रचनाकार: संत जनाबाई

जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें । साद्य परिसिलें तुम्हीं संती ॥१॥ अहो ज्ञानदेवा असावें तुम्हा ठावें । येणें काय लहाणीव आणिली आम्हां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें। साध्य परिसिलें तुम्हीं संतीं ॥१॥ अहो ज्ञानदेवा असावें तुम्हां ठावें । येणें काय लहाणीव आणिली आम्हां ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

जन्म आला पुत्र माहाभगवद्भक्त। फालगुणपक्ष वद्य द्वितीया ॥१॥ शकेत सोळाशे नवदीत जाण विठाबाई खूण सांगते जाण ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

जन्म कर्म अवघें व्यर्थ । ज्ञाते विवेकीं घेती अर्थ ॥१॥ हरि हाचिधर्मा मुख्य । रामकृष्ण उच्चारी मुखें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्म कोट्यांनीं हरिसेवा जोडे । नवविद्या भजन सांग घडे । तंव वैराग्य तें पाहें पुढें । पूर्व प्राचीन फळ रोकडें ॥१॥ ऐसें तैंच मिळती ते साधु । ज्यांचा संग करी उद्धोधु । ज्यांचा स्पर्श करी आल्हादु । ज्यांचा महिमा न कळे आनंदु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्म गेले याचे राखतां गाई । याचिया बोला वि-श्वास काई ॥१॥ गोधनें राखितो आपण पेंढारा । तुझ्यानी मिळती पाणियाचा थारा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी । दुःखी सेशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थुळ कारणीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्म जरा तुटती रोग । धरितां अनुराग हरिनामींची ॥१॥ ऐसा अनुभव सांगती संत । पावले प्रतीत आंगेंचि ते ॥२॥

रचनाकार: संत निळोबा