भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनीं वनी हरी आहे निरंतरी

janin vani hari ahe nirantari

जनीं वनी हरी आहे निरंतरी । बोलिलीं वैखरीं व्यासमुखें ॥१॥ जगजीवईंश्वर क्षरला चराचर । लक्षालक्ष पार अलिप्तपणें ॥२॥ चहूं देहां ग्रासी व्याला तत्त्वें तत्त्वेसी । हरि वैराटेसी एक वृक्ष ॥३॥ ज्ञानदेवो म्हणे वृक्षही वृक्ष न होणें । असोनि नसणें सुमनीं जैसें ॥४॥