भजनी मालिका

भजने

जन्मांतरीं शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरले ॥१॥ वोडवलें संचित येणें जन्में पाहतां । आतां पंढरिनाथा कृपा करीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्मासी येऊनि पहा रे पंढरी । विठ्ठल भीमातीरीं उभा असे ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । आलियांसी तारी दरुशनें एका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥ जन्मोनी संसारीं झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्मोजन्मींच्या सायासीं । विठ्ठल लाधला पुंडलिकासी ॥१॥ पूर्वी पुण्य केलें वो माये । विटे लाधले या विठोबाचे पाये ॥२४॥

जन्मोनी प्राणी नाम न घेत वाचे । त्याचिया जन्माचें व्यर्थ वोझें ॥१॥ प्रसवोनी तयां वांझ तो जननी । बुडविलीं दोन्हीं कुळें त्यानें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जप जाप्य तप नको अनुष्ठान । पंचाग्नि साधन नको ॥१॥ नको तीर्थाटन नको मंत्रावळी । वेदशास्त्र जाळीं गुंतुं नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी उभा ॥१॥ राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम