भजनी मालिका

भजने

जयाकारणें श्रमलें भांडती । वेदादिकां न कळे मती । वोळला सगुण मूर्ती । पुंडलिकाकारणें ॥१॥ धन्य धन्य पावन देखे । पुण्यभूमि पावन सुरेख । तया गातां होतसे हर्ष । प्रेमानंदे डुल्लती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाचिया अंगीं सकळ त्या कळा । तो परब्रह्मा पुतळा पंढरीये ॥१॥ वेदांती सिद्धांती थकले धादांती । परी एकाचीही मती चालेचिना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाचिया भेटी जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागें ॥१॥ ऐसा उदार पंढरीराणा । पुरवी खुणा मनींच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयांचियासाठीं जातो वनाप्रती । ते तों सांगाती येती बळें ॥१॥ जयांचियासाठीं टाकिला संसार । ते तों बलवत्तर पाठीं येती ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

जयाचियें द्वारी तुळशीवृंदावन । धन्य तें सदन वैष्णावांचे ॥१॥ उत्तम चांडाळ अथवा सुशीळ । पावन सकळ वैकुंठी होती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥१॥ करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥१॥ शत्रु तो म्यां केला न म्हणें आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जयाचीं ती अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में ॥१॥ अगाध श्रीहरीचा महिमा । त्याचा पार नेणें ब्रह्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाची तुम्हांसी करणें चिंता । तयातें पुरवितां आनकळित ॥१॥ आलिया गेलियाचेनी हातें । सभाग्य तयातें धरुं धांवा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जयाची समदृष्टी पाहुं धावे मन । शोभते चरण विटेवरी ॥१॥ कानडें कानडें वेदांसी कानडें । श्रुतीसी जो नातुडें गीतीं गातां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयांचें अंगलें लेतां नाहीं मान । शोभा नेदी जन हांसविलें ॥१॥ गुसिळतां ताक कांडितां भूस । साध्य नाहीं क्लेश जाती वांयां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जयांचे उदारपण काय वानुं । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु । वेधीं विधियेलें आमुचें मनु । तो हा देखिला सावळा श्रीकृष्ण ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जयांचें चित्त संताच्या चरणा । तेणें नारायणा जिंकियलें ॥१॥ भावें देव मिळे भावें देव मिळे । संतचरणीं लोळे सर्व काळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयाचें दरुषण होतांची दुरुनी । सर्व जाये पळोनी पाप ताप ॥१॥ तीर्थासी पावन कलिमलछेदन । देवाचें कल्याण जयाचेंनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जयाचेचि चरणीं तीर्था तीर्थपण । तों हृदयीं केला सांठवण ॥१॥ नवल महिमा हरिदासाची । तीर्थें उपजती त्याचे कुशीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ