भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाचिया भेटी जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागें

jayachiya bheti jatan | moksha sayujyata pathin lagen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयाचिया भेटी जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागें ॥१॥ ऐसा उदार पंढरीराणा । पुरवी खुणा मनींच्या ॥२॥ एक वेळ दरुशनं । तुटतीं बंधनें निश्चयें ॥३॥ एका जनार्दनीं ऐक्याभावें । काया वाचा मनें गावें ॥४॥