भजनी मालिका

भजने

जरी आलें राज्य मोळविक्या हातां । तरी तो मागुता व्यवसायी ॥१॥ तृष्णेचीं मंजुरें नेणती विसांवा । वाढें हांव हांवां काम कामीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जरी झाला तपस्वी थोर । तरी असावें दूर परस्त्रिसी ॥१॥ गुरुनींही एकांतासी । न वजावें स्त्रीयांसी उपदेशा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जरी तो येईल येथें हरी । तरी मी सहसा विलंब न करीं । धोपटूनिया शिळेवरी । तेच क्षणी टाकीन ॥१॥ काळासम तुल्य माझें बळ । काय तें करील कृष्ण गोवळ । लागों नेदितां एकही पळ । निमिषाधेंचि उपटीन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जरी न बनेचि गुरुवचनीं । तरी बैसोनि सहजासनीं । हेंचि एक निर्वाणी । साधेजे सुख ॥१॥ सकळीं सकळपणें । अखंडरूप पाहणें । साध्य हेंचि साधनें । करुनी घेईं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदों जिव्हे ॥१॥ सकळां इंद्रियां हे माझी विनंती । नका होऊं परतीं पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जरी मी नव्हतों पतित देवा । तरि तूं पावन कैंचा येथ ॥१॥ म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जरी म्हणसी देव देखिला । तरी हा बोल भला नव्हे नाम्या ॥१॥ जोंवरी मी माझें न तुटे । तंव आत्माराम कैसेंनि भेटे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जळ स्पर्शा जाता स्नानीं । तंव चिन्मात्र भासे जीवनीं ॥१॥ कैसी वहाताहे गंगा । स्नानीं हारपलें अंगा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जळीं बुडबुडे देखतां देखतां । क्षण न लागतां दि-सेनाती ॥१॥ तैसा हा संसार पाहतां पाहतां । अंत:काळीं हासां काय नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥१॥ पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जळो ते जाणींव जळो ते शाहाणींव । राहो माझा भाव विठ्ठलपायीं ॥१॥ जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थीर विठ्ठलपायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम