भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळो ते जाणींव जळो ते शाहाणींव । राहो माझा भाव विठ्ठलपायीं

jalo te janinv jalo te shahaninv | raho majha bhav viththalapayin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जळो ते जाणींव जळो ते शाहाणींव । राहो माझा भाव विठ्ठलपायीं ॥१॥ जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थीर विठ्ठलपायीं ॥ध्रु.॥ जळो हा लौकिक जळो दंभमान । लागो जीव ध्यान विठ्ठलाचें ॥२॥ जळो हें शरीर जळो हा संबंध । राहो परमानंद माझा कंठीं ॥३॥ तुका म्हणे येथे अवघें चि होय । धरीं मना सोय विठोबाची ॥४॥