भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाचियें द्वारी तुळशीवृंदावन । धन्य तें सदन वैष्णावांचे

jayachiyen dvari tulashivrundavan | dhanya ten sadan vaishnavanche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयाचियें द्वारी तुळशीवृंदावन । धन्य तें सदन वैष्णावांचे ॥१॥ उत्तम चांडाळ अथवा सुशीळ । पावन सकळ वैकुंठी होती ॥२॥ जयांचिया मळां तुळशीमाळा । यम पदकामळा वंदी त्याच्या ॥३॥ गोपीचंदन उटाई जयाचिया अंगीं । प्रत्यक्ष देव जगें तोचि धन्य ॥४॥ एका जनार्दनीं तयाच सांगात । जन्मोजन्मी प्राप्त हो कां मज ॥५॥