भजनी मालिका
← भजनांकडे परत

जप तप कर्म क्रिया नेम धर्म

jap tap karma kriya nem dharma

जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वाघटीं राम भावशुध्द ॥१॥ न सोडी रे भावो टाकीरे संदेहो । रामकृष्णीं टाहो नित्य फोडी ॥२॥ जाती वित्त गोत कुळ शीळ मात । भजे कां त्त्वरित भावना युक्त ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । तेणें वैकुंठभुवनीं घर केलें ॥४॥