भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली

janmojanmin amhin bahu punya kelen | mag ya viththalen krupa keli

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥ जन्मोनी संसारीं झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥ भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसें या देवासी मन माझें ॥३॥ आणिका देवासी नेघें माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥४॥ एका जनार्दनीं मज तेथें न्यावें । हाडसोनी द्यावें संतांपाशीं ॥५॥