भजनी मालिका
← भजनांकडे परत

जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी उभा

jap tap dhyan na lage dharana | viththalakirttanamaji ubha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी उभा ॥१॥ राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ध्रु.॥ कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां ॥२॥ तुका म्हणे मुक्ती हरीदासांच्या घरीं । वोळगती चारी ॠद्धीसिद्धि ॥३॥