भजनी मालिका

भजने

जड हेंचि खळे आयुष्याची रासी । काळ माप रसी मवीतसे ॥१॥ माप तें लागलें माप तें लागलें । मात तें लागलें झडा झडा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जडला जीवीं तो नव्हेचि परतां । चित्तीं चिंता व्यापूनियां ॥१॥ बुध्दीमाजीं याचेंचि ठाणें । राहटें करणें अहोरात्रीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥१॥ ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तोचि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जडित मुद्रिका बाहुभूषणें । करीं कंकणे सुशोभितें ॥१॥ पितांबरे घातली कास । हेमरत्नास जिंकियलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जतन करा रे जतन करा । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें ॥१॥ अवघे चि निजों नका अवघिये ठायीं । वेळ अवेळ तरी सांभाळावी कांहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥१॥ विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥ वर्दळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण तें त्याचें त्यासी नाहीं ॥१॥ म्हणऊनि मागें परतलें मन । घालणीचें रान देखोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन तुम्ही करारे उदीम । वाचे स्मरा नारायण । तो तुम्हां चुकवील जन्ममरण । मायाभ्रमण चुकवील ॥१॥ तारुं करुनी शरिराचें । केणें भरिलें हरिनामाचें । शिड उभविलें सत्त्वाचें । वल्हें पडती धर्माचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥ अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोन नेतां नये ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जन पूजी याचा मज कां आभार । हा तुह्मी विचार जाणां देवा ॥१॥ पत्र कोण मानी वंदितील शिक्का । गौरव सेवका याचि मुळें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन मानविलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥१॥ म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम