भजनी मालिका

भजने

जगांचे जीवन भक्तांचे मोहन । सगुण निर्गुण ठाण शोभतसे ॥१॥ तें रुप गोकुळीं नंदाचिये घरीं । यशोदे मांडिवरी खेळतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगाचें जीवन मनाचें मोहन । योगियांचें ध्यान विठ्ठल माझा ॥१॥ द्वैताद्वैताहुनि वेगळा । श्रीविठ्ठल कळा पौर्णिमेचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगात्रजीवना अगा नारायणा । कां नये करुणा दासाची हे ॥१॥ अच्युता केशवा ये गा दीनानाथा । सर्वज्ञ समर्था कृपामूर्ति ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जगामध्यें काय हालत । तें दृष्टीसी नाहीं भरत । अचळ असोनि चळत । चंचळ म्हणत आहे मुठींत ॥१॥ कैसें बोटानें दाखवुं तुला । सावध होई गुरूच्या मुला । हा शब्द अचोज वेगळा अर्थ जाणे सहस्त्रांत विरळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगामध्यें दिसे बरें की वाईट । ऐसाचि बोभाट करीन देवा ॥१॥ आतां कोठवरी धरावी हे भीड । तुम्हीं तो उघड जाणतसां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

जगामाजीं कीर्ति ऐक श्रीराम । वाउगा तुं श्रम न करीं जना ॥१॥ सदा सर्वकाळ आठवी वेळोवेळां । मग सुखसोहळा काय उणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगासी तारक हरि हा उच्चार । सर्व वेरझार खुटें जेणें ॥१॥ पाहता ब्रह्मांडीं व्यापका तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं भरलासे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगासी भुलवणा भाविकांचे मन । तो जनार्दन विटेवरी ॥१॥ कामारी कामारी ऋद्धिसिद्धि घरीं । तो परमात्मा श्रीहरीं विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगीं जनार्दन मुख्य हाचि भाव । संत तेचि देववृति ऐसी ॥१॥ समाधी साधन संतजन । विश्रांतीचें स्थान संतापायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगीं तो व्यापक भरुनी उरला । शरण तूं तयाला जाय वेगीं ॥१॥ उघडा मंत्र जाण वदे नारायणा । नोहे तुज विध्व यमदुत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥१॥ करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें माझें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जघन प्रमाण दावीत श्रीअनंत । या रे या रे म्हणत भेटावया ॥१॥ आवडीची धणी ध्या रे प्रेमभावें । संतचरणां द्यावें आलिंगन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जटिल धुळधुसिर दोंदिल डोळसु अंगणीं बाळचंद्र खेळतां दिसे ॥ तें देखोनियां यशोदा माया पसरोनिया बाह्या ॥