भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगामध्यें दिसे बरें की वाईट । ऐसाचि बोभाट करीन देवा

jagamadhyen dise baren ki vait | aisachi bobhat karin deva

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
जगामध्यें दिसे बरें की वाईट । ऐसाचि बोभाट करीन देवा ॥१॥ आतां कोठवरी धरावी हे भीड । तुम्हीं तो उघड जाणतसां ॥२॥ ब्रीदाचा तोडर बांधलासे पायीं । त्रिभुवनीं ग्वाही तुमची आहे ॥३॥ चोखा म्हणे जेणें न ये उणेपण । तेंचि तें कारण जाणा देवा ॥४॥