भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगीं धन्य एक नाम । गातां उत्तम सर्व नेम

jagin dhanya ek nam | gatan uttam sarva nem

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगीं धन्य एक नाम । गातां उत्तम सर्व नेम ॥१॥ धन्य धन्य पंढरपुर । नांदे भीमातीर विठ्ठल ॥२॥ धन्य धन्य वेणुनाद । वसे गोविंद ते स्थानीं ॥३॥ धन्य धन्य गोपाळपुर । करिती गोपाळ गजरेकं काला ॥४॥ एका जनार्दनीं पाद्माळें । अखंड सोहळें तये गांवीं ॥५॥