भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगामध्यें काय हालत । तें दृष्टीसी नाहीं भरत । अचळ असोनि चळत । चंचळ म्हणत आहे मुठींत

jagamadhyen kay halat | ten drushtisi nahin bharat | achal asoni chalat | chanchal mhanat ahe muthint

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगामध्यें काय हालत । तें दृष्टीसी नाहीं भरत । अचळ असोनि चळत । चंचळ म्हणत आहे मुठींत ॥१॥ कैसें बोटानें दाखवुं तुला । सावध होई गुरूच्या मुला । हा शब्द अचोज वेगळा अर्थ जाणे सहस्त्रांत विरळा ॥२॥ कांहीं नसोनि तें दिसत । नाहीं म्हणतां सत्य भासत । आकारीं आकार लपत । वाउगें जाणत्यासी भासत ॥३॥ अहं सोहं कोहं लपाला । उघड दृष्टीरूपा आला । जगीं व्यापक नसोनि व्यापला । एका जनार्दनीं गुरुपुत्र भला ॥४॥