भजनी मालिका

भजने

जग हें अवघें सारें ब्रह्मरूप । सर्वांभूतीं एक पांडुरंग ॥ १ ॥ अणुरेणू पर्यंत ब्रह्म भरीयेलें । सर्वांघटीं राहिलें अखंडित ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

जगजेठी तेव्हां क्रोधावला चित्तीं । करीन मी शांति तुझी आतां ॥१॥ माझिया लेंकरा दिधलासे त्रास । करीन मी नाश आतां तुझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जगत्रय जननी मुक्ताबाई माते । कृपा करीं वरदहस्तें मजवरी ॥१॥ आदिनाथें अनुग्रह नाथासी दिधला । नाथें हस्त ठेविला मस्तकीं तुमच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगत्रयजीवन अंतर्निष्ठ ज्ञान । तरी संतासीं शरण रिघिजे भावें ॥१॥ हेचि भक्ति ज्ञान वैराग्याचे निधी । विवेकेंसीं बुद्धि नांदे माझी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जगदात्मा श्रीहरि आनंदें पूजीन । अंतरीं करीन महोत्सव ॥१॥ शांति सिंहासनीं बैसवीन भावें । बैसावें अवघें हारकारीन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगदानिया हें ब्रीद आहे जगीं । तें आजि मजलागीं काय जालें ॥१॥ मज पाहतां विसरू पडिला त्या नामाचा । कीं तुज आमुचा वीट आला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जगदिश जगदिश तुज म्हणती । परि या जनामाजी असशील युक्ती । पुण्यपापविरहित सकळां अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

जगलागीं शिणती रात्रंदिन । यज्ञयागादिकरिता हवन । ध्येय ध्यान धारणा अनुष्ठान । साधिती अष्टांग आणि पवन ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जगाचा जनक बाप हा कृपाळू । दीनवत्सल प्रतिपाळु पांडुरंग ॥१॥ पहा डोळेभरी द्वैत तें टाकुनी । करील झाडणी महत्पापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगाचा जो पिता । म्हणसी ईश्वरु नियंता । त्यासी विद्या अविद्या दोघी कांता । एकी माथां अर्धांगी ॥१॥ पाहता ईश्वर करणी । माथां बैसविली राणी । हा महिमा वेदीं पुराणीं । गाती कीर्तनीं निरंतर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥१॥ मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जगाचियें देहीं नांदतो आपण । तरी करतें कर्म परियेसा ॥१॥ जीव शिव दोन्हीं शरीरीं नांदती । कर्मधर्म स्थिति तया हातीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगाचिये नेत्री दिसे तो संसारीं । परि तो अंतरीं स्फटिक शुद्ध ॥१॥ वायांचि हांव नधरी कांहीं पोटीं । वाउगी ती गोष्टी न करी जगा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगाची ती रहाटी । जैशी अंधाहातीं दिली काठी । चिखलाची पाउती । काय मार्ग दिसे ॥१॥ तैसे भुलोनियां जन । गेले म्हणती माझे जाण । बा कवणाचें कवण । कामा न ये शेवटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जगाचें जीवन ब्रह्मा परिपुर्ण । जनीं जनार्दन व्यापक तो ॥१॥ तो ह्री गोकुळीं रांगणा नंदाघरीं । गौळणी त्या सुंदरीं खेळविती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ