भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगा काळ खाय । आह्मी माथां दिले पाय

jaga kal khay | ahmi mathan dile pay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जगा काळ खाय । आह्मी माथां दिले पाय ॥१॥ नाचों तेथें उभा राहे । जातां व्यंग करी साहे ॥ध्रु.॥ हरीच्या गुणें धाला । होता खात चि भुकेला ॥२॥ तुका म्हणे हळु । जाला कढत शीतळु ॥३॥