भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगाचा जनक बाप हा कृपाळू । दीनवत्सल प्रतिपाळु पांडुरंग

jagacha janak bap ha krupalu | dinavatsal pratipalu pandurang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगाचा जनक बाप हा कृपाळू । दीनवत्सल प्रतिपाळु पांडुरंग ॥१॥ पहा डोळेभरी द्वैत तें टाकुनी । करील झाडणी महत्पापा ॥२॥ ज्या कारणें योगी साधन साधिती । ती हे उभी मुर्ति भीमातटीं ॥३॥ एका जनार्दनीं भक्त करुणाकर । ठेवुनी कटीं कर उभा विटे ॥४॥