भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगा सुख भोगणे आहे

jaga sukh bhogane ahe

रचनाकार: संत बोधले · अभंग
जगा सुख भोगणे आहे । सेवा विठोबाचे पाय ॥१॥ शुध्द करा तुमचे मन । लावा विठोबासी ध्यान ॥ २॥ दुष्टबुध्दी दुर करा । तोडा अविद्येचा थारा ॥३॥ निवळ करा अंतःकरण । तुम्हा जवळी नारायण ॥४॥ बोधला म्हणे भाव धरा । तारु निर्वाणीचा खरा ॥५॥