भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं

jan dev tari payan chi padaven | tyachiya svabhaven chad nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥ अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोन नेतां नये ॥२॥ तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥३॥