भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन मानविलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों

jan manavilen vari bahyatkarin | taisa mi antarin nahin jalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन मानविलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥१॥ म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥ संतां ब्रम्हरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥२॥ तुका म्हणे मी तों आपणांसी ठावा । आहें बरा देवा जैसा तैसा ॥३॥