भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें । साद्य परिसिलें तुम्हीं संती

janinen bolilen taisench lihilen | sadya parisilen tumhin santi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें । साद्य परिसिलें तुम्हीं संती ॥१॥ अहो ज्ञानदेवा असावें तुम्हा ठावें । येणें काय लहाणीव आणिली आम्हां ॥२॥ माझी मज आण सांगतें प्रमाण । सेवितें चरण तुझे स्वामी ॥३॥ जनीव हो बोल स्वानंदाचे डोल । स्वात्ममुखीं बोल दुणावती ॥४॥ शुद्ध सत्त्व कागद नित्य करी शाई । अखंडित लिही जनीपाशीं ॥५॥ हांसोनी ज्ञानदेवें पिटियेली टाळी । जयजयकार सकळीं केला थोर ॥६॥