भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्म जरा तुटती रोग । धरितां अनुराग हरिनामींची

janma jara tutati rog | dharitan anurag harinaminchi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जन्म जरा तुटती रोग । धरितां अनुराग हरिनामींची ॥१॥ ऐसा अनुभव सांगती संत । पावले प्रतीत आंगेंचि ते ॥२॥ तरोनि आपण आणिकां तारिती । जड जीवा दाविती मार्ग सोपा ॥३॥ निळा म्हणे नाम वरिष्ठ साधना । माजीं त्रिभुवना आख्या याची ॥४॥