भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी म्हणे पांडुरंगा माझ्या जीवींच्या जीवलगा। विनवितें सांगा। महिमा साधुसंतांचा

jani mhane panduranga majhya jivinchya jivalaga| vinaviten sanga| mahima sadhusantancha

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनी म्हणे पांडुरंगा माझ्या जीवींच्या जीवलगा। विनवितें सांगा। महिमा साधुसंतांचा ॥१॥ कैसी वसविली पंढरी। काय महिमा भीमातीरीं । पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥ कैसा आला हा गोविंद। कैसा झाला वेणुनाद । येउनी नारद । कां राहिला ॥३॥ कृपा करा नारायणा सांगा अंतरींच्या खुणा येऊं दे करुणा दासी जनी विनवितसे ॥४॥