भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण

janma yeuniyan kay punya kelen | balapan gelen vanyanvin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण ॥१॥ संतसंगें सुख हुंडारलें जाणा । नामसंकीर्तना ओळखत ॥२॥ तरुणपणोंहि नाठवेचि देवा । वृद्धपणीं सेवा अंतरली ॥३॥ यापरी जन्मुनि गेलसिरे वांयां । पंढरीच्या राया नोळखतां ॥४॥ आलों मी संसारीं गुंतलों व्यापारीं । आझूनि कां श्रीहरि नोळखली ॥५॥ सहस्र अपराध जरी म्यांरे केले । तारिलें विठ्ठलें म्हणे नामा ॥६॥