भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्माचें व्याज आपणचि गिळिलें

janmachen vyaj apanachi gililen

जन्माचें व्याज आपणचि गिळिलें । मुदलाचा ठावो नाहीं ऐसें केलें ॥१॥ रिणाईत नव्हे हा निर्गुणासि समंधु । येणें परमबोधु बोधविला ॥२॥ ऐसी आपुली साक्षी कवणें पै द्यावी । निवृत्ति म्हणे कांहीं ठायीं न ठेवीची ॥३॥ बापरखुमादेविवरें केला घातासि घातु । आपुला लक्षाचा लाभु वरी दिधला ॥४॥