भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मा येऊनियां नरा । न करी आयुष्याचा मातेरा

janma yeuniyan nara | na kari ayushyacha matera

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्मा येऊनियां नरा । न करी आयुष्याचा मातेरा ॥१॥ वाचे उच्चारी हरहर । तेणें सुखरुप संसार ॥२॥ शिवनामीं होई रत । सदा समाधान चित्त ॥३॥ म्हणे एका जनार्दन । शिवनामें भरो वदन ॥४॥