भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मांची वेरझारी । तुम्हांविण कोण वारी । जाचलों संसारी । सोडवण करी देवराया

janmanchi verajhari | tumhanvin kon vari | jachalon sansari | sodavan kari devaraya

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
जन्मांची वेरझारी । तुम्हांविण कोण वारी । जाचलों संसारी । सोडवण करी देवराया ॥१॥ शरण शरण पंढरीराया । तुम्हां आलों यादवराया । निवारोनियां भया । मज तारा या सागरीं ॥२॥ तुम्हांविण माझें कोडें । कोण निवारी सांकडें । मी तों झालों असे वेडे । उपाय पुढें सुचेना ॥३॥ चोखा म्हणे दीनानाथा । आतां निवारीं हे भवव्यथा । म्हणोनी ठेवितसें माथा । चरणांवरी विठूच्या ॥४॥