भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाईच्या

janma yeuni kan re nidasura | jayen bheti vara rakhumaichya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाईच्या ॥१॥ पाप ताप दैन्य जाईल सकळ । पावसी अढळउत्तम तें ॥ध्रु.॥ संतमहंतसिद्धहरीदासदाटणी । फिटती पारणीं इंद्रियांचीं॥२॥ तुका म्हणे तेथें नामाचा गजर । फुकाची अपार लुटी घेई ॥३॥