भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां

janmalyapasuni soshile pravas | viyog pahavaya jale atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां ॥१॥ आतां एक करीं धावणिया धांवा । बुडतों केशवा काढीं मज ॥२॥ लाभ नव्हे हानि जाली भागाभाग । तूंचि पांडुरंग पुरविसी ॥३॥ नामा म्हणे ऐसें सर्वस्व रक्षिलें । पाषाण तारिले जळामाजीं ॥४॥