भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें

janma alon tyachen | aji phal jalen sachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥१॥ तुम्ही सांभाळिलों संतीं । भय निरसली खंती ॥ध्रु.॥ कृतकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥२॥ तुका म्हणे काळ । आतां करूं न शके बळ ॥३॥