भजनी मालिका

भजने

अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी । पतितपावन प्रौढी तुझी देवा ॥१॥ माझिया निदैवें ऐसेंचि घडलें । तूं तंव आपुलें न संडिसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अपराधाविण बळी । घातला पाताळीं । सवें कणव उपजली । द्बार राखिसी तयाचें ॥१॥ गार्‍हाणें सांगवें कवणा । केशवा सुजाणा । कोणी आणिक तुजविणा । नाहीं दुसर आह्मातें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अपराधी म्हणोनि येतों काकुलती । नाहीं तरी होती काय चाड ॥१॥ येईल तारूं तरी तारा जो जी देवा । नाहीं तरी सेवा घ्यावी भार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अपाय उपाय न टाकी कीर्तन । सदा सर्वकाळ ध्यान रामकृष्ण ॥१॥ तयाचिये घरीं वसे नारायण । लक्ष्मी सह आपण कार्य करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अपार संत झाले क्षितीं । ऐकिलें ऐकाल पुढेंही होती ॥१॥ जे जे झाले हरिचे दास । करितां कीर्तनें सांडुनी आस ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अंबऋषिराया पडिले सायास । सोसी गर्भवास स्वयें देव ॥१॥ उच्छिष्टहीं खातां प्रायश्चित्त असे । गोपाळांचें ग्रास खाय हरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अबोलणें बोल कुंठीट पै जाहलें । तें निधान देखिलें नंदाघरीं ॥१॥ अधिष्ठान मुळ व्यापक सकळ । जगाचें तें कुअळ कल्पद्रुम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभक्त ब्राम्हण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥ वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अभक्त सभक्त दोघांसी सारखा दिसे । लवनीं जैसें नदिसे दुजेपण गे माय ॥१॥ ऐसा परात्पर सोइरा पुंडलिकाचे पाठीं । मौन्य वाक्पुटीं धरुनी गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभक्ता दुर्जना यमदुत यातना । नानापरी जाणा करिताती ॥१॥ नाम नाहीं मुखीं दूत तया ताडिती । नेऊन घालिती कुंभपाकीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ