भजनी मालिका

भजने

अनाम जयासी तेचं रूपा आलें । उभें तें राहिलें विटेवरी ॥१॥ पुंडलिकाच्या प्रेमा युगे अठ्ठावीस । समचरणी वास पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अनिर्वाच्य ब्रह्म निगम ह्मणती शिणले वेवादति अठरा साही ॥१॥ तें हें पुंडलिकें चोहोंटा उभें केलें । भावें भुलविलें पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरूं वचन मागिलांचा ॥१॥ त्याचे पाय माझे लागोत कपाळीं । भोग उष्टावळी धन्यकाळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनुतापावांचुनी नाम न ये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ॥१॥ मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुद्ध तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुतापें करीं नामस्मरण वाचे । तंव मोहिनी येउनी साचे कर धरी ॥१॥ आडवी मोहिनी उगवतां दिन । सत्वाचें हरण करुं पाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य क्षेत्र अनुपम्य देव । नसे तोचि ठाव पंढरीये ॥१॥ अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । अनुपम्य भंगा दोष जाती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य ज्ञान अनुपम्य मतें । अनुपम्य सरतें पंढरीयें ॥१॥ अनुपम्य वेद अनुपम्य शास्त्र । अनुपम्य पवित्र पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य नारीनर ते दैवाचे । अनुपम्य त्यांचे पुण्य देखा ॥१॥ अनुपम्य वास जयांसी पंढरी । प्रत्यक्ष वैकुंठपुरी अनुपम्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ