भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनामिकादि चांडाळ । नामें सकळ तारिले

anamikadi chandal | namen sakal tarile

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनामिकादि चांडाळ । नामें सकळ तारिले ॥१॥ ब्रह्माहत्या पापराशी । नामें वैकुंठवासी पावले ॥२॥ दुराचारी व्याभिचारी । गणिकानारी तारिली ॥३॥ एका जनार्दनीं नाम । मंगळधाम मंगला ॥४॥