भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरूं वचन मागिलांचा

anutapayukta geliya abhiman | visarun vachan magilancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरूं वचन मागिलांचा ॥१॥ त्याचे पाय माझे लागोत कपाळीं । भोग उष्टावळी धन्यकाळ ॥ध्रु.॥ षडउर्मी जिंहीं हाणितल्या लाता । शरण या संता आल्या वेगीं ॥२॥ तुका म्हणे जाती वोळे लवकरी । ठायीं चि अंतरीं शुद्ध होती ॥३॥